Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरत्नागिरी

MP Narayan Rane Birthday : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांसाठी खास भेट

MP Narayan Rane Birthday : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांसाठी खास भेट

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून निवळी येथील माहेर या अनाथ निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे पाण्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी कूपनलिका खोदून देण्यात आली. याचा प्रारंभ आज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.



उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याचे महत्व प्रामुख्याने कळतं कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरीसुद्धा कोकणात उन्हाळ्यात पाण्याचे दुष्काळ असते. रत्नागिरी शहरानजीक निवळी येथील माहेर संस्थेलाही पाण्याच्या या समस्येला दरवर्षी तोंड द्यावे लागते. याबाबत संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. या समस्येची दखल घेत या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज माहेर संस्थेच्या परिसरामध्ये कूपनलिकेचे भूमिपूजन केले. रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्वखर्चाने माहेर संस्थेला येथे कूपनलिका खोदून देत आहे.


यानिमित्ताने माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ काम करते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम यांच्यासह या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणारे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment