सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या राजनंदिनी अनय कांबळे (रा. कोनापुरे चाळ) हिचा घरातील जिन्यावरून वरच्या खोलीत जाताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. शॉक लागल्यावर कुटुंबीयांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण करंट सुटला नाही. डोळ्यादेखत तिचा जीव गेला.
अवकाळी पाऊसही सुरू होता. राजनंदिनी घराच्या वरच्या मजल्यावरील तीन लहान मुलांकडे निघाली होती. घराच्या जिन्याच्या पहिल्याच पायरीवर तिने पाय ठेवला आणि तिला शॉक बसला. सर्व्हिस केबलचा शॉक असल्याने तिला स्वतःची सुटका करून घेता आली नाही. तिच्या घराच्या वरील खोलीत तीन चिमुकली मुले होती, सुदैवाने त्यांना काही झाले नाही. राजनंदिनीला एक भाऊ असून तो इयत्ता अकरावीत आहे. लहान बहीण सातवीत शिकते. त्यांची आई मजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवते. राजनंदिनीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
Prabhadevi Railway Bridge : प्रभादेवी रेल्वे पूलचे लवकरच पाडकाम; वाहतूक मार्गात होणार हे बदल
नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या. याचमुळे कोनापुरे चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला त्याच वेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने त्या विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हरवले मात्र डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.