मुंबई(ज्ञानेश सावंत) : सुरुवातीचे दोन सामने गमावल्या नंतर राजस्थान आता पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन करत आहे. मागील दोन्ही सामन्यात त्यांनी चेन्नई आणि पंजाब विरुद्ध विजय मिळवला आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे यशस्वी जैस्वाल पुन्हा फॉर्म मध्ये आला आहे, त्यामुळे राजस्थान फलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे.
आजचा सामना हा अशा दोन संघामध्ये आहे जे एकमेकासाठी प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघ फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये एकमेकांस आव्हान देणारे आहेत. दोंघाची सलामीची जोडी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यामुळे आजच्या सामन्यात एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहू शकते.
नरेंद्र मोदी स्टेटडियम हे गुजरातचे घरचे मैदान आहे आणि त्याचा फायदा ते नक्कीच उचलतील परंतु राजस्थान देखील सहजा सहजी हार मानणार नाही. दोन्ही संघाच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे तर दोन्ही संघात चांगले तेज गोलंदाज आहेत जे सातत्याने चांगली गोलंदाजी करताना दिसतात. आजचा सामना हा जोफ्रा आर्चर विरुद्ध महमद सिराज असा असेल. दोघामध्ये कोणाची गोलंदाजी सरस ठरते याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.