Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्यावतीने विक्रमी मालमत्ता कर वसूल, आयुक्तांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई महापालिकेच्यावतीने विक्रमी मालमत्ता कर वसूल, आयुक्तांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतक्या रकमेचे मालमत्ता कर संकलन करण्यात आले आहे. ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. ही कामगिरी बजावणारे करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी हा छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई महापालिकेच्यावतीने विक्रमी मालमत्ता कर वसूल, आयुक्तांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेने या आर्थिक वर्षात दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.

मालमत्ता कर संकलनातील ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर उद्दिष्टापेक्षाही अधिक कर संकलन करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा बुधवारी गौरव करण्यात आला. यामध्ये सहायक कर निर्धारक व संकलक विवेक राऊळ (आर मध्य विभाग, ११७ टक्के), अनुप्रिया जाधव (सी विभाग, ११२.८१ टक्के), हृदयनाथ गोसावी (के पूर्व विभाग, ११२.८१ टक्के), राजू काठे (एफ उत्तर विभाग, ११२ टक्के), महेश साळगावकर (एन विभाग, १११.९३ टक्के), अशोक नाईक (एम पश्चिम विभाग, १११ टक्के), दत्तात्रय गिरी (एफ दक्षिण विभाग, ११०.८६ टक्के), उमाकांत वैष्णव (एम पूर्व विभाग, ११०.६१ टक्के), प्रसाद पेडणेकर (ए विभाग, १०६.६९ टक्के), अनिल साळगावकर (एल विभाग, १०५.०९ टक्के), सूर्यकांत गवळी (जी उत्तर विभाग, १०४.५३ टक्के), दीपक गायकवाड (एस विभाग, १०४.४५ टक्के), धर्मेंद्र लोहार (टी विभाग, १०१.३६ टक्के), संतोष ठाकूर (डी विभाग, १००.९१ टक्के), दिलीपकुमार साळुंखे (आर उत्तर विभाग, १००.८६ टक्के) यांचा समावेश होता. याशिवाय, अन्य ९ सहायक करनिर्धारक व संकलकांनाही प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -