नागपूर : नागपूर मधून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर मधील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ही आग आज (दि ९) दुपारच्या सुमारास लागली. आग इतकी तीव्र होती की सतत होणाऱ्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Thane News : राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार!
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि ९) दुपारी तीनच्या दरम्यान नागपूर मधील वैशालीनगर येथे असलेल्या फटाक्याच्या गोदामातून फटाक्यांचा आवाज आणि आगीचे लोट दिसू लागले. रहिवाशांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली.अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी पोहोचल्या. स्फोटांच्या भीतीने पोलिसांनी गोदामाच्या आजुबाजूचा परिसर तातडीने सील केला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दरम्यान पोलीस ही आग कशामुळे लागली असेल याची अधिक चौकशी करत आहेत.