Friday, April 18, 2025
Homeदेशभारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार, ६३ हजार कोटींचा करार होणार

भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार, ६३ हजार कोटींचा करार होणार

नवी दिल्ली : भारत नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार आहे. हा ६३ हजार कोटी रुपयांचा करार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात नौदलासाठीच्या राफेलकरिता करार होणार आहे.

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता

या करारांतर्गत फ्रान्सची दसॉल्ट कंपनी भारतीय वैमानिकांना नौदलासाठीचे राफेल चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच नौदलाच्या तंत्रज्ञांना राफेलच्या देखभाल दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतात नौदलासाठीच्या राफेलची निर्मिती केली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू भारत दौऱ्यावर येतील. त्यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यात नौदलासाठीच्या राफेलकरिता करार होणार आहे. करार झाल्पापासून पाच वर्षांच्या आत फ्रान्सकडून भारताला राफेलचा पुरवठा होणार आहे.

Tahawwur Rana : महत्त्वाची बातमी, २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाला २४ तासांत भारतात आणणार

राफेल एम हे जगातील सर्वात प्रगत नौदल लढाऊ विमानांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भारत फ्रान्सकडून अत्याधुनिक अशी २२ सिंगल सीटर आणि चार डबल सीटची व्यवस्था असलेली राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. या विमानांचा ताफा भारताच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर तैनात केला जाणार आहे. शत्रूकडून असलेली आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तसेच भारताची स्वरसंरक्षणाची आणि लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी राफेल हे सर्वाधिक उपयुक्त विमान आहे. यामुळेच भारत सरकारने नौदलासाठी राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी भारत सरकारने हवाई दलासाठी राफेल विमानांची खरेदी केली. हवाई दलाच्या चांगल्या अनुभवानंतर आता नौदलासाठीच्या राफेलची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधुनिक लँडिंग गिअर, फोल्डिंग विंग्स, प्रतिकूल स्थितीत डेक लँडिंग आणि टेलहूकचा सामना करण्यासाठी अंडरकॅरेज, उड्डाण सुरू असताना हवेतच इंधन भरुन घेण्याची क्षमता, दोन इंजिन अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नौदलाचे राफेल दीर्घ काळ आकाशात राहून काम करण्यास सक्षम आहे. नौदलाची नवी राफेल विमानं ही मिग-२९के विमानांच्या ताफ्याला पूरक असतील. राफेलचा ताफा आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर तर मिग-२९के विमानांचा ताफा आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहक नौकेवर ठेवण्याचे नियोजन आहे. डीआरडीओने विकसित केलेली आधुनिक विमानंही नौदलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत.

सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ३६ राफेल विमानांचा ताफा आहे. नौदलात २०३१ पर्यंत २६ राफेलचा ताफा असेल. यामुळे भारतीय हवाई दल आणि नौदल यांची ताकद वाढणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -