पुणे : लग्नाचे आश्वासन देऊन मुलींना फसवणाऱ्यांची संख्या जगात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंड येथे नेत लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर तरुणीकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील मालाड मधील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Tahawwur Rana : महत्त्वाची बातमी, २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाला २४ तासांत भारतात आणणार
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्या वेळी आरोपी कबीर खान (वय ३०) याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आत्तापर्यंत पुणे, सांताक्रुझ, मुंबई, नेपाळ, थायलंड आणिअझरबैजान या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने बँक खाते जास्त व्यवहारांमुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यासह विविध कारणे सांगून तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान या घटनेचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.