अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील २३व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा दारूण पराभव झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २१७ धावा केल्या. साई सुदर्शनने यावेळी ८२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातला २००चा टप्पा गाठता आला. मात्र
प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या राजस्थानला मात्र १५९ धावाच करता आल्या. राजस्थानचा गुजरातविरुद्ध ५८ धावांनी दारूण पराभव झाला. राजस्थानकडून संजू सॅमसन, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांनी चांगली खेळी करत राजस्थानचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. संजूने ४१ धावा केल्या तर रियान परागने २६ धावा केल्या. हेटमायरने ५२ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या ८२ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. साई सुदर्शनने ५३ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत ८२ धावा फटकावल्या. जोस बटलर ३६ धावा करून बाद झाला. तर शाहरूख खान ३६ धावा करून बाद झाला. राहुल तेवतियाने २४ धावा केल्या. यामुळे गुजरातने २१७ धावा केल्या.