मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं मंगळवारी (दि. ८) निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सलीम यांची प्राणज्योत मालवली.सलीम यांचं निधन कशामुळे झालं, याविषयी कोणतंही कारण अद्याप कळू शकलं नाही. सलीम यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सलीम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Prabhadevi Railway Bridge : प्रभादेवी रेल्वे पूलचे लवकरच पाडकाम; वाहतूक मार्गात होणार हे बदल
सलीम अख्तर यांनी निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. ‘फूल और अंगारे’, ‘कयामत’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांच्या निर्मितीमागे सलीम अख्तर यांचं मोठं योगदान होतं. याशिवाय १९९७ साली रिलीज झालेल्या ‘राजा की आएगी बारात’ सिनेमाची निर्मिती करुन राणी मुखर्जीला त्यांनी इंडस्ट्रीत लाँच केलं. याशिवाय २००५ साली ‘चाँद सा रोशन चेहरा’ सिनेमातून त्यांनी तमन्ना भाटियाला लाँच केलं होतं.
नवीन टॅलेंटला इंडस्ट्रीत प्रोत्साहन देण्यात सलीम अख्तर यांचं मोलांचं योगदान होतं. बॉलिवूडचा सुवर्णकाळ ज्यांनी बघितला आणि अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती ज्यांनी केली अशा सलीम यांच्या निधनाने कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.