Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीतुमचे Axis बँकमध्ये खाते आहे का? तर हे तुमच्यासाठी

तुमचे Axis बँकमध्ये खाते आहे का? तर हे तुमच्यासाठी

अ‍ॅक्सिस बँकने डिजिटल सुरक्षेसाठी सुरू केली ‘इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी’ सुविधा

मुंबई: भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ‘ओपन’ या मोबाईल अ‍ॅपवर या उद्योगातील पहिलीच अशी ‘इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी’ (वन-टाईम पासवर्ड) सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांच्या ओळखीची सुरक्षितपणे पडताळणी करणे आणि ओटीपी-आधारित फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून ग्राहकांचे रक्षण करणे हा या सुविधेचा उद्देश आहे.

या नाविन्यपूर्ण सुविधेमुळे ग्राहकाला ‘एसएमएस’द्वारे ओटीपी पाठविला जाण्याऐवजी ‘अ‍ॅप’मध्येच मर्यादित वेळेपुरता ‘वन टाईम पासवर्ड’ (टीओटीपी) निर्माण केला जातो. त्यामुळे दूरसंचार नेटवर्कवरील अवलंबित्व पूर्णपणे टळते. तसेच ओळखीची पडताळणी अधिक जलद, अधिक सुरक्षित होते आणि फसवणुकीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. मोबाईल ओटीपी ही अ‍ॅक्सिस बँकेच्या एकूण फसवणूक प्रतिबंध धोरणातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. भारतातील सर्वात सुरक्षित बँक होण्याच्या दिशेने असे विविध उपक्रम राबवण्याचा बँकेचा मानस आहे.

उद्योगामध्ये सायबर हल्ल्यांचा धोका वाढत असताना, विशेषतः एसएमएस-आधारित ओटीपीवर आधारित सिम स्वॅप आणि फिशिंगसारख्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर अॅक्सिस बँकेची ‘इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी’ सुविधा एक सुरक्षित, मोबाईल उपकरणाशी संलग्न आणि मर्यादित वेळेपुरता पर्याय पुरवते. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो. वापरकर्ते ही मोबाईल ओटीपी सुविधा इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिनसाठी वापरू शकतात आणि व्यवहाराच्या पडताळणीसाठीही हा पर्याय निवडू शकतात. ही सुविधा आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा उपलब्ध आहे. ती केवळ इंटरनेटवर कार्यरत असल्यामुळे प्रवासादरम्यान, विशेषतः समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी तिचा विशेष उपयोग होतो. याशिवाय, ग्राहकांना लॉगिन आणि व्यवहाराचे प्रयत्न यांबाबतची माहिती रिअल-टाईममध्ये मिळते. यातून त्यांना परदर्शकता मिळते व खात्यावर अधिक नियंत्रण आणता येते.

या संदर्भात समीर शेट्टी, प्रेसिडेंट अँड हेड – डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन,अ‍ॅक्सिस बँक, म्हणाले, “फसवणुकीच्या घटना कमी व्हाव्यात आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेत वाढ व्हावी यासाठी आम्ही अ‍ॅक्सिस बँकेत विविध उपाययोजना राबवीत आहोत. आमच्या ‘ओपन’ या मोबाईल अ‍ॅपवर‘इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी’ सुविधा सुरू करणे हे आमच्या ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल बँकिंग अनुभव देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी आम्ही अनेक स्तरांवर संरक्षक कवच उभे करीत असून त्याकरीता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहोत. ‘मोबाईल ओटीपी’ हा पर्याय दूरसंचार नेटवर्कवरील अवलंबित्व कमी करतो. त्यातून सुरक्षितता वाढते आणि ग्राहकांना एक अखंड, अधिक विश्वासार्ह ओळख पडताळणीचा अनुभव मिळतो.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -