Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेSurya Water Supply Project : सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त!

Surya Water Supply Project : सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त!

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी राबविण्यात येणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Surya Water Supply Project) येत्या सहा महिन्यात पुर्ण होऊन नागरिकांना दिवाळीपर्यंत २४ तास पाणीपुरवठा होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी योजनेच्या पाहणी दौऱ्याच्या प्रसंगी व्यक्त केल्याने आता प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त मिळाला आहे.

Chardham Yatra : एप्रिल महिनाअखेरीस सुरु होणार चारधामचे दर्शन! ‘बद्रीनाथ-केदारनाथ’मध्ये रील्स आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी

मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी २१८ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेली ५ वर्षे रखडली होती. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असुन मीरा-भाईंदर महापालिका वासियांना शुद्ध, २४ तास पिण्याचे पाणी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वसई काशिद कोपर ते चेने जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेने वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनी, चेने येथील खासगी जागेतील पुलाचे काम ,चेने येथील जलकुभांचे कामे या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा घेऊन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपरोक्त कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. (Surya Water Supply Project)

गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील लोकांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या बनला आहे. या पाणीपुरवठा योजने बाबत मी लोकप्रतिनिधी असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे अभिवचन पुर्ण करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. (Surya Water Supply Project)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -