Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीPAT Exam Inquiry : ‘पॅट’ परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सखोल चौकशीची...

PAT Exam Inquiry : ‘पॅट’ परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेण्यात येत असलेल्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ (पॅट) परीक्षेची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एससीईआरटीने संबंधित युट्युब चॅनलच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणाची सखोल चौकशीही शिक्षण विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या पॅट परीक्षेला सुरवात झाली आहे. या अंतर्गत इयत्ता नववीची मराठी प्रथम भाषा या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मिडियाद्वारे फुटली. केवळ एकाच नव्हे तर जवळपास २० हून अधिक यु-ट्युब चॅनलवर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दिसून आले.

Shirdi News : भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा

अर्थात, एससीईआरटीमार्फत संबंधित युट्यूब चॅनेल्सच्या चालकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कारवाईचा बडगा उगारला. परंतु, मुळात ही प्रश्नपत्रिका नेमकी फुटली कोठून याचा शोध एससीईआरटीने घेणे आवश्यक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -