Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीकुर्ला, पवई, बोरिवली येथील ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय

कुर्ला, पवई, बोरिवली येथील ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय

अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाकडे संबंधित प्रस्ताव सादर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल ४ एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर सुमारे ३.५ हजार झाडांचे पारंपरिक पद्धतीने रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. विकासकामांआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. दरम्यान, पर्यावरणाशी समतोल साधत विकासकामांवर भर देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत वेळोवेळी वृक्षारोपण केले जाते. वृक्षसंपदेत वाढ कावी यादृष्टीने गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्षलागवडीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता लवकरच महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ४ एकर भूखंडावर पारंपरिक पद्धतीने ३.५ हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. याबाबत राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

झाडांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर

वृक्ष लागवडीचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वृक्ष लागवड आणि झाडांच्या सुरुवातीच्या देखभालीची सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून दोन वर्षांनंतर या झाडांची देखभाल महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत केली जाणार आहे, विकासकाने पवई, कुर्ला आणि योरिवलीतील जागेवर चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करून टीडीआर स्वरूपात तीन भूखंड महापालिकेला वृक्षारोपणासाठी हस्तांतरित केले, त्यानतर महापालिकेने या ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्ताच्या मंजुरीनंतर या भूखंडांवर हरित क्षेत्र विकसित होणार आहे. परिणामी, पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -