
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मन हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले असून घटनास्थळी सर्वच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे. सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व १० कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर व दिल्लीसाठी (हजरत निझामुद्दीन) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय ...
शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये शिवाजी जाधव यांना १ गोळी तर सुरेखा जाधव यांना ३ गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजतंय. शिवाजी जाधव (६५) आणि सुरेखा जाधव (६०) यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.