Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ३३ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ३३ टक्के पाणीसाठा

पाणीसाठा खालावला तरीही प्रकल्प अजूनही कागदावरच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यात फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी नवीन धरण गेल्या दहा वर्षांत बांधलेले नाही, तर गारगाई धरण, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प कागदावरच असून पुढील किमान पाच-सहा वर्षे मुंबईला उन्हाळ्यात पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे.

ऊध्वं वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७हजार दशलक्ष लिटर आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत मिळून ५ लाख ६६ हजार ५९९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंचईच्या अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते आहे. मनपाचे बोट पाणी गळतीकडे : मनपा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, लोकसंख्येनुसार पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच पाणीगळतीचे प्रमाणही कमी करण्याची गरज आहे. १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे मविआ सरकारच्या काळात मनपाने तो बाजूला ठेवला होता. दुसरीकडे समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणारा प्रकल्पही निविदेच्या पातळीवरच आहे.

सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी

मुंबईकर गेल्या पर्षापासूनय १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करत आहेत. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहिल्यास अप्पर वैतरणा जलाशयात ९२ हजार ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊध्वं वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख २ लाख ३८ हजार ९५९ दशलक्ष लिटर, विहारमध्ये १२ हजार ३९० दशलक्ष लिटर आणि तुळशीमध्ये सर्वात कमी ३ हजार ५५० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -