मुंबई : मेट्रो स्थानकातून (Mumbai Metro) बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी वा रेल्वे स्थानक, बेस्ट स्थानक, रिक्षा-टॅक्सी थांब्यापर्यंत जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी अनेक मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडली जात आहेत. त्यानुसार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली – गायमख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेवरील चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डनर ही चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
या निविदेनुसार १२९ कोटी रुपये खर्च करून काम सुरू झाल्यापासून १५ महिन्यांच्या कालावधीत पादचारीपुलांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. हे पादचारीपूल तयार झाल्यास विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकातून बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे. (Mumbai News)
पंतनगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा एमएमआरडीएकडून ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ मार्गिकेचे आणि कासारवडवली – गायमूख अशा २.८८ किमी लांबीच्या ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आता एमएमआरडीएने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील मेट्रो स्थानकाबाहेर पडत इच्छितस्थळी वा रिक्षा थांबा, टॅक्सी थांबा तसेच बेस्ट स्थानक वा नजीकच्या रेल्वेस्थानकापर्यंत प्रवाशांना पोहचणे सोपे व्हावे यासाठी मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार नुकत्याच विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारीपुलांची बांधणी करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. निविदेनुसार पंतनगर मेट्रो स्थानक येथे ६६५ मीटर लांबीचा, विक्रोळी मेट्रो स्थानक येथे ३८७ मीटरचा, भांडूप मेट्रो स्थानक येथे ४५ मीटरचा, तर विजय गार्डन मेट्रो स्थानक येथे ६० मीटर लांबीचा पादचारीपूल बांधण्यात येणार आहे. या चारही पुलांसाठी १२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पंत नगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा, ६६५ मीटर इतका असणार आहे.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…