२४ तासांत निर्णय बदलला नाही तर आम्ही ५०% कर लादू’; डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी
वॉशिग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी चीन आणि भारतासह जगातील १८० देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युध्द पेटले असून,चीनने प्रत्युत्तरादाखल शुल्क जाहीर करून अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेकडून चीनला २४ तासाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरीफच्या मुद्द्यावरून चीनला थेट इशारा दिला आहे. जर त्यांनी अमेरिकन वस्तूंवर लावलेला ३४ टक्के कर रद्द केला नाही तर अमेरिका चीनवर ५० टक्के कर लादेल.” असे ट्रम्प सरकारकडून म्हटले आहे. ट्रम्प यांनी चीनला हा निर्णय घेण्यासाठी २४ तासाचा अल्टीमेटम दिला आहे.
Nitesh Rane : वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ३ हजार ४० कोटींचा निधी मंजूर
ट्रम्प यांनी चीनला इशारा देताना,”जर चीनने आपले कर मागे घेतले नाहीत तर अमेरिका केवळ मोठे कर लादणार नाही तर चीनसोबतच्या सर्व वाटाघाटी देखील थांबवेल “अशी सरळ धमकी दिली आहे. खरंतर, अमेरिकेने काही चिनी वस्तूंवर शुल्क लादले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादले. यामुळे ट्रम्प संतापले आहेत.
ट्रम्प म्हणाले, “चीनने आधीच खूप जास्त कर लादले आहेत. अशा परिस्थितीत, अधिक कर लादणे योग्य नाही. जर कोणत्याही देशाने अमेरिकेवर अधिक कर लादून प्रतिसाद दिला तर त्यांना लगेचच आणखी मोठ्या करांना सामोरे जावे लागेल.” जर चीनने ८ एप्रिल २०२५ पर्यंत व्यापारातील अनियमितता आणि ३४% कर वाढ मागे घेतली नाही, तर अमेरिका ९ एप्रिलपासून चीनवर अतिरिक्त ५०% कर लादेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासोबतच, चीनसोबत सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि बैठका देखील थांबवल्या जातील. आपल्या टॅरिफ धोरणाचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, जगातील अनेक देश अमेरिकेशी वाटाघाटी करत आहेत, परंतु आता वाटाघाटीसाठी योग्य पद्धत निश्चित करण्यात आली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेसोबतच्या व्यापारात अनेक देशांनी अन्याय्य वर्तन केले आहे. आता हा दृष्टिकोन बदलावा लागेल, विशेषतः चीनला त्याचे वर्तन सुधारावे लागेल.
ट्रम्प ‘टॅरिफ’विरोधात आता आरपारची लढाई : चीनचा अमेरिकेला इशारा
अमेरिकेला प्रत्युत्तर देत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने प्रत्युत्तरात्मक शुल्कही जाहीर केले. यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी आयातीवर ५०% अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिल्यानंतर चीनने ८ एप्रिल रोजी ‘टॅरिफ’विरोधातील लढाई यापुढे आरपारची असेल, असा इशारा दिला आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने चीनवर लादलेला कथित वाढीव कर हा पूर्णपणे निराधार आणि एकतर्फी गुंडगिरीचा प्रकार आहे. चीनने उचललेले प्रतिउपाय त्याचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि सामान्य आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था राखण्यासाठी आहेत. ते पूर्णपणे वैध आहेत.“चीनवरील आयात करात वाढ केल्यानंतर अमेरिकेची धमकी ही चुकीनंतरची आणखी एक चूक आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग स्वभावाचा पर्दाफाश करते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिकेने आपल्याला त्याच्या मार्गावर जाण्यास भाग पाडले तर चीन शेवटपर्यंत त्याच्याशी लढेल,” असे त्यात म्हटले आहे.
चीन कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही
अमेरिकेबद्दल चीनची भूमिका खूप कडक आहे. चीन कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देत आहे.