पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेली आषाढी वारी यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.
Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाचं मैदान गाजवणार!
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा १९ जून २०२५ रोजी संजीवन समाधी मंदिरातून होणार आहे. तर देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान १८ जून २०२५ रोजी होईल. पालखी मार्गावर एकूण १७ मुक्काम असतील आणि ६ जुलै २०२५ रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
यंदा माऊलींची पालखी २२ जून रोजी सासवडमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर २३ जूनला मुक्काम, आणि २४ जून रोजी सासवडहून पुढील प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थानकडून संपूर्ण पालखी मार्गाचा आणि मुक्कामस्थळांचा आढावा घेतला जात आहे. सासवडमधील पालखी तळ, रस्त्याचे काम, व अन्य व्यवस्थांसाठी तयारीला वेग आला आहे.
सध्या फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची तारीख समोर आली आहे. परंतु संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.