नाशिक : बदलते तंत्रज्ञान आणि विकसित होणारा समाज यामुळे जग जवळ आले आहे. असे असले तरी एखाद्या गोष्टीचा अतिवापर केल्याने त्याचे परिणाम देखील तितकेच वाईट असतात. आजची तरुणाई मैदानी खेळांपेक्षा मोबाईलवर जास्त रमते. याच मोबाईलच्या आहारी गेलेली मुले नकळत्या वयातच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक मध्ये उघडकीस आली आहे. नाशिक मधील शाळेच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात कंडोम आणि अमली पदार्थांसारख्या वस्तू सापडल्या आहेत. या प्रकारानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील घोटीच्या एका खासगी विद्यालयातील मुख्याध्यापकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचं दप्तर तपासलं. यावेळी आठवी आणि नववीच्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चैन, लोखंडी कडे, कंडोम पाकीटे, पत्त्यांचे कीट आणि अंमली पदार्थ सापडले. हा प्रकार पाहताच शाळा प्रशासनाने थेट पालकांना बोलावून घेत समज दिली. तसेच त्यांच्याकडून लेखी हमी देखील घेतली आहे. परंतु, या प्रकारानंतर शाळा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.