कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात टक्कर झाली. शेवटपर्यंत रोमहर्षक पाहायला मिळाला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. मात्र केकेआरला विजयासाठी ४ धावा कमी पडल्या.
शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी २४ धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. रिंकु आणि हर्षितने रवी बिश्नोईने टाकलेल्या षटकांत १९ धावा करता आल्या.
कोलकाताची सुरवात ताबडतोब झाली. मात्र त्यांना पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रुपात बसला. तो १५ धावा करून बाद झाला. तेव्हा कोलकाताची धावसंख्या ३७ होती. यानंतर सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी वेगवान धावांची गती सुरू ठेवली. कोलकाताने ६ षटकांत ९० धावा केल्या. यावेळेस नरेम १३ बॉलमध्ये ३० धावांची खेळी केली. तर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. रहाणे बाद होताच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे केकेआरचा संघ कोसळत गेला. वेंकटेश अय्यरने ४५ धावा केल्या.