मुंब्रा : मुंब्र्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्र्यात १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने मुंब्र्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा ठाकूरपाडा परिसरातील मुंब्रादेवी अपार्टमेंट येथे एक १० वर्षीय मुलगी आपल्या इमारती खाली इतर मुलींसोबत खेळत होती. शेजारच्या श्रद्धा प्राप्ती इमारतीत राहणाऱ्या नराधम आसिफ अकबर मन्सूरी (वय १९) याने पिडीत मुलीबरोबर खेळताना गोड बोलून तिला खेळणी देण्याच्या बहाण्याने श्रध्दा अपार्टमेंट इमारतीमध्ये घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करून इमारतीच्या व्हेंटिशन डक्ट मध्ये फेकून दिले. काल (दि ७) रात्रीच्या सुमारास श्रद्धा प्राप्ती इमारतीच्या व्हेंटिशन डक्ट मध्ये इमारती वरून काही तरी जड वस्तू खाली पडल्याचा आवाज आल्याने उपस्थित रहिवाशी घटनास्थळी धावले. रहिवाशांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुंब्रा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रूम क्रमांक १०३ च्या स्वच्छता गृहाच्या बाजूला असलेल्या उघड्या खिडकीतून बॅटरीचा साह्याने पाहिले असता अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह असल्याचे निदर्शनात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी सीडीच्या साह्याने या डक्ट मध्ये उतरून या मुलीचा मृतदेह बाहेर काढला . दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.