शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू (Mohan Babu) यांनी शिर्डीत (Shirdi Sai Darshan) येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नप्पा’ या चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना केली असल्याचं मोहन बाबू यांनी सांगितले आहे.
अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेल्या ‘कन्नप्पा या चित्रपटाच्या यशासाठी आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगत, लवकरच हा चित्रपट ५ भाषेत प्रदर्शित होणार आहे. माझा कुठल्याही नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करतो, असे मोहन बाबू यांनी म्हटले.
साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मोहन बाबू यांचा शॉल आणि साईमूर्ती देऊन सत्कार केला. तसेच साईबाबांच्या कृपेनं ‘कन्नप्पा’ हा चित्रपट यशस्वी ठरो आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
‘कन्नप्पा’ या चित्रपटाचा यशासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच हा चित्रपट देव आधी देव महादेव यांचे परमभक्त ‘कन्नप्पा’ यांच्या जीवनकथेवर आधारित असल्याने भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर या तिन्ही महादेवाच्या ज्योतिर्लिंग ठिकाणी जाऊन दर्शन घेणार असून या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणार असल्याचही मोहन बाबू यांनी सांगितले.
‘कन्नप्पा’ हा चित्रपट मोहन बाबू यांनी निर्मित केला असून मुकेश कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कन्नप्पा हा एक ऐतिहासिक महाकाव्य आहे ज्यात भगवान शिवाच्या एका महान भक्ताची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. मोहनलाल, अक्षय कुमार, प्रभास आणि काजल अग्रवाल यांच्या उत्कृष्ट अभिनयासह विष्णू मंचू कन्नप्पाची भूमिका साकारत आहेत. तर प्रीती मुकुंदन देखील मुख्य भूमिका साकरणार आहे. दरम्यान, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…