मुंबई : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मात्र या कार्यकर्त्याला त्रास होत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे समजते आहे.
Summer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा ‘ही’ चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील भाजप कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे हे कामानिमित्त मुंबईत आले होते. मंत्रालयाच्या जवळ आकाशवाणी येथील आमदार निवासातील रुम नं ४०८ ही आमदार विजय देशमुख यांच्या खोलीत ते राहत होते. सोमवारी (दि ७) रात्री ११:३० च्या सुमारास त्यांना छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेला सतत संपर्क करण्यात आला. मात्र कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर पोलिसांना फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून जीटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पोहचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार निवासातून फोन जाऊनही रुग्णवाहिका येत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.