Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

'आपले सरकार' पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

'आपले सरकार' पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

मुंबई : 'आपले सरकार' पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी १० ते १४ एप्रिल, २०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत 'आपले सरकार' सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील 'आपले सरकार' केंद्र चालक, 'सेतू' केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


Comments
Add Comment