राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरित करण्याचे निर्देश
अलिबाग : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी राज्य सरकारने केलेल्या आराखड्यास ६०६ कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी १९५.७० कोटींचा निधी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.
२८ मार्च २०२३ रोजी एकूण मंजूर ६०६.०९ कोटीपैकी गेल्या दोन वर्षात २३०.७० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप ३६५. ३९ कोटी रुपयांचा नियोजित निधी रायगड किल्ला विकास योजनेस प्राप्त झालेला नाही. किल्ले रायगडच्या विकासासाठी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून ३५ कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या निधीमधून पर्यटन विकासाची कामेही केली आणार आहेत.
१८ जूनपासून पालखी सोहळ्याला सुरुवात, ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये होणार आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा
रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासासाठी ६०६.०९ कोटी रक्मेच्या आराखड्यास संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर आराखड्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सदर आराखडयातील कामांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांना आतापर्यंत एकूण रक्कम १९५.७० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. निधी जिल्हाधिकारी, रायगड यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मंजूर करण्यात आलेली रकम आहरण करून संबंधितांना वितरीत करण्यासाठी संबंधित सहायक जिल्हा नियोजन अधिकारी / जिल्हा नियोजन अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व संबंधित जिल्हाधिकारी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. नियंत्रण अधिकारी यांचा कोड ०००२८ असा आहे. सदर निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम त्यांनी संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात देयके सादर करून संबंधितांना वितरीत करण्यात यावे.
सदर कार्यवाहीबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात यावा. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हाधिकारी यांनी संदर्भाधीन क्र.९ अन्वये ५० कोटी इतका निधी वितरीत करण्याची विनंती केली आहे. तथापि या आराखड्यातील कामांसाठी सुधारित अंदाजानुसार प्राप्त झालेला ३५ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती.