एका महिलेचा मृत्यू, आरोपी चालकाला अटक
मुंबई : कांदिवली (प.) येथे रस्ता ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांना शनिवारी भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर मालाड पश्चिम येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी जखमी महिलेच्या तक्रारीवरून निष्काळजीपणे टेम्पो चालवल्याबद्दल चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली.
Devendra Fadanvis : दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार – मुख्यमंत्री
या अपघातात भारती सुभाष शहा (७१) यांचा मृत्यू झाला. तर हंसा प्रवीणकुमार घिवाला (७१) जखमी झाल्या. त्याच्या पायाला व कमरेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिासांनी दिली. घिवाला या कांदिवलीमधील डहाणूकरवाडी येथे राहतात. हंसा घिवाला यांच्या तक्रारीनुसार, घिवाला काही वस्तू खरेदी करण्यासाठी शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडल्या. कांदिवलीतील येथील एस. व्ही रोड, सेंट्रल बॅक ऑफ इंडियासमोरून घिवाला रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भारती शहाही त्यांच्यासोबत रस्ता ओलांडत होत्या.