Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वव्यापार युद्धामुळे महामंदीची शक्यता...

व्यापार युद्धामुळे महामंदीची शक्यता…

डॉ. सर्वेश सुहास सोमण

मागील २ आठवड्यांपूर्वीच्या लेखात मी सांगितल्याप्रमाणे शेअर बाजारात आलेली तेजी ही तात्पुरती असून पुढील काळात पुन्हा मंदीची लाट येईल असे सांगितले होते. आपण सांगतल्यानंतर पुन्हा एकदा निर्देशांक निफ्टीमध्ये जवळपास १५०० अंकांची मोठी घसरण पहावयास मिळाली आहे. सध्या व्यापार युद्ध तीव्र होत आहे. त्यामुळे पुढे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकतेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफनंतर वॉल स्ट्रीटमध्ये आर्थिक चिंतेची लाट उसळली आहे. आघाडीच्या बँकांनी यापूर्वीच संभाव्य मंदीबाबत इशारा दिला आहे. या धोरणांमुळे अमेरिकन व्यवसायिकांमध्ये देखील अविश्वास निर्माण होऊ शकतो. तसेच पुढील काळात मागणी आणि पुरवठा साखळीतही अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.सध्या सुरू असलेल्या ट्रंप यांच्या निर्णयामुळे इतर देशांचे कर वाढतील. ताज्या अहवालानुसार बेरोजगारीचा दर देखील ४.५% पर्यंत वाढू शकतो. सर्व अमेरिकी व्यापार भागीदारांचे प्रत्युत्तरात्मक टॅरिफ सरासरी १५% पर्यंत वाढू शकते. संपूर्ण जगाचे लक्ष आता व्हाइट हाऊस आणि फेडरल रिझर्व्ह बँकेवर असेल. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जाणार याकडे जगाचे लक्ष आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेवरही आर्थिक दबाव वाढला आहे. आता या टॅरिफच्या परिणामांना सौम्य करण्यासाठी फेड २०२५ मध्ये तीन वेळा व्याजदर कपात करू शकते. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २३३५० ही विक्रीची पातळी असून निफ्टीची दिशा आणि गती मंदीची आहे. पुढील आठवड्यात देखील निर्देशांकातील मंदी कायम राहणे अपेक्षित आहे. मागील आठवड्यातील दबाव बघता निफ्टीमध्ये आणखी ४०० ते ५०० अंकांची मोठी घसरण होऊ शकते. ज्यामध्ये निफ्टी २२४०० ते २२५०० या पातळीपर्यंत येऊ शकते.

शेअर बाजाराच्या घसरणीत अनेक शेअर्स हे आकर्षक किंमतीला आलेले असून आपण मागील लेखात सांगितलेला ‘हॅपीएस्ट माईंड’ या कंपनीच्या शेअरमध्ये १५७५ रुपये या उच्चांकापासून मोठी घसरण झालेली असून मागील आठवड्यात देखील यामध्ये आणखी घसरण झाली. आज ५८६ रुपये किंमतीला असणाऱ्या याचा दीर्घमुदतीसाठी विचार केल्यास यामध्ये चांगली वाढ होऊ शकते.

(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -