
पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झाले. या प्रकरणात दिनानाथ मंगशेकर रुग्णालयात प्रॅक्टिस करत असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. रुग्णालय प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय याची दखल घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगशेकर रुग्णालय सोमवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषदेतून रुग्णालय प्रशासन स्वतःची बाजू मांडणार आहे.
याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना चाकणकर यांनी मंगेशकर रुग्णालय पैशांसाठी अडून बसले आणि गरोदर महिलेचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवला. माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होईल, असेही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या.
मंगेशकर रुग्णालय प्रकरणी धर्मादाय आयुक्त स्वतंत्र अहवाल सादर करणार आहेत. हा अहवाल आल्यावर त्या प्रकरणात पुढील निर्णय घेतले जातील; असे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.