Tuesday, April 8, 2025
Homeक्राईमया नराधमांना मित्र म्हणायचे की हैवान? १९ वर्षीय मुलीवर २३ जणांकडून बलात्कार!

या नराधमांना मित्र म्हणायचे की हैवान? १९ वर्षीय मुलीवर २३ जणांकडून बलात्कार!

मन सुन्न करणारी घटना

वाराणसी (उत्तर प्रदेश) : वाराणसी जिल्ह्यात मानवता हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीवर सात दिवसांच्या कालावधीत तब्बल २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दरम्यान ती मदतीसाठी मित्रांकडे गेली असता त्या नराधमांनीही आपल्या अन्य मित्रांसोबत तिच्यावर अत्याचार केले. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान आरोपींनी तिला विविध हॉटेल्स, कॅफे आणि हुक्का बारमध्ये नेऊन अमानुष पद्धतीने अत्याचार केला.

पीडित मुलीने कसेबसे आरोपींच्या तावडीतून सुटून घरी पोहोचताच, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), ७४ (विनयभंग), १२३ (विष वा नशा देणे), १२६(२), १२७(२), आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कुडाळात गळफास घेऊन पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

अत्याचाराची काळी सात दिवसांची मालिका

अतिरिक्त पोलीस आयुक्त विदुश सक्सेना यांनी सांगितले की, पीडित तरुणी २९ मार्च रोजी काही मित्रांसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. ४ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबियांनी हरविल्याची तक्रार दिली. पुढील चौकशीत तिच्यावर सात दिवसांदरम्यान विविध ठिकाणी क्रूरतेने अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

तिच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार:

  • सुरुवातीला ती एका मैत्रिणीकडे गेली असताना एक आरोपी तिला लंका परिसरातील एका कॅफेमध्ये घेऊन गेला आणि बलात्कार केला.

  • दुसऱ्या दिवशी रस्त्यात भेटलेल्या आणखी दोन जणांनी तिला नादेसर परिसरात नेऊन पुन्हा अत्याचार केला.

  • त्यानंतर तिला तिसऱ्याने एका कॅफेमध्ये नेले, जिथे आधीच पाच जण होते. तिला नशेचे औषध दिले गेले आणि सर्वांनी बलात्कार केला.

  • १ एप्रिल रोजी दुसऱ्या एका आरोपीने तिला हॉटेलमध्ये नेले, जिथे तिला “क्लायंटसाठी मालिश” करण्यास सांगून अत्याचार केला गेला.

  • यानंतर, तिला औरंगाबादजवळील एका गोदामात नेऊन तिघांनी पुन्हा बलात्कार केला.

  • तिथून सुटून ती सिग्रा येथील मॉलबाहेर बसली असताना, पुन्हा एका व्यक्तीने खाण्याचे आमिष देत तिला नशा देऊन अस्सी घाट येथे नेले आणि अत्याचार केला.

  • तिथून सावरून ती एका मित्राकडे गेली, पण तिथेही तिच्यावर बलात्कार झाला. अखेर ती तिथून पळून जाऊन घरी परतली.

पुढील कारवाई सुरू

सध्या पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून, तिचे मनोबल व मानसिक आरोग्य यासाठी सल्लागारांची मदत घेतली जात आहे.
पोलिसानी या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत इतर आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत केले आहे.

दरम्यान, ही घटना केवळ कायद्यासमोर आव्हान नाही, तर समाज म्हणून आपण कुठे आहोत याचा आरसा ठरते. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकजुटीने भूमिका घ्यावी, हीच अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -