ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! माजिवडा उड्डाणपूल १५ दिवस बंद

नाशिकला जाण्यासाठी असणार पर्यायी मार्ग


ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोच्या या कामांमुळे अनेक भागांत खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते बंद करण्यात येत आहेत. घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मेट्रोचे हे काम चालणार आहे.


मेट्रोच्या या कामामुळे ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. त्यावर जॅक बौम टाकून जंक बीस उभारल्यानंतर राफ्टर उभारला जाणार आहे. या काळात येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाने दिली आहे; परंतु या कामामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.


मेट्रोच्या छताचे काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ही क्रेन मुंबई, नाशिक, घोडबंदर, माजीवडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर चढणी या ठिकाणी उभी करून हे काम होणार आहे. त्यासाठी माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. माजिवडा उड्डाणपूल १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून नाशिक अथवा गुजरातकडे जाणारी वाहतूक या पुलावरून बंद असणार आहे. वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.



....असा करावा लागणार प्रवास


• मुंबईकडून घोडबंदर अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनाना विवियाना मॉल समोरील बीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने ज्युपिटर हॉस्पिटल समोरील स्लीप रोडने जाऊन कापूरबावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील.


• नाशिककडे जाणाऱ्या वाहनाही ब्रिज चढणीच्या सुरुवातीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनाही स्लीप रोडने जाऊन गोल्डन क्रॉसमार्गे पुढे जावे लागणार आहे. हे वाहतूक बदल ५ एप्रिलपासून १९ एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा