Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीअपात्र शिधापत्रिका रद्द होणार; १ एप्रिलपासून सुरुवात

अपात्र शिधापत्रिका रद्द होणार; १ एप्रिलपासून सुरुवात

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ३१ मे पर्यंत शोधमोहीम चालणार

मुंबई (प्रतिनिधी): अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यभरातील अपात्र शिधापत्रिका (रेशनकार्ड) रद्द करण्यासाठी १ एप्रिलपासून शोधमोहीम हाती घेतली आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशनकार्ड दिल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. विभागाने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला. ही शोधमोहीम दोन महिने म्हणजे २१ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. अपात्र रेशनकार्ड शोधण्याची मोहीम २८ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार हाती घेण्यात आली होती. पण त्यानंतर चारच महिन्यात त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा नव्याने सुधारित मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ती दरवर्षी राबवली जाणार आहे.

अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच काडांची तपासणी आता केली जाईल. जो कार्ड अपात्र असल्याचे आढळेल ती लगेच रद्द केली जाणार आहेत. सर्व रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील काडांची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत ते स्पष्ट होईल. अर्ज भरताना वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वपपिक्षा जुना नसावा, ही मुख्य अट आहे. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत पुरावा सादर न केल्यास रेशनकार्ड रद्द करण्पात येणार आहे.

एका पत्त्यावर दोन रेशनकार्ड असतील किंवा एका कुटुंबात दोन रेशनकार्ड दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाणार आहे. या शोधमोहिमेत शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, कामगार ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि अशांकडे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असेल तर ती तत्काळ अपात्र ठरविली जातील. त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाईल. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती आणि मृत व्यक्तींना लाभार्थीच्या मादीतून वगळले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -