Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGold Rate Today : ग्राहकांसाठी गुडन्यूज! दरवाढीनंतर सोन्याच्या भावात घसरण

Gold Rate Today : ग्राहकांसाठी गुडन्यूज! दरवाढीनंतर सोन्याच्या भावात घसरण

बघा काय आहेत आजचे सोन्याचे दर

मुंबई : सध्या लगीनसराईचे दिवस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सोनं खरेदीदारांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र आज सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला असून काहीशी घसरण झाली आहे. जाणून घ्या इतर शहरातील आजचे सोन्याचे दर.

ST Bus : एसटीच्या ५० कालबाह्य बसेस भंगारात; परिवहन महामंडळाचा निर्णय

आज सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार ८०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९ लाख ६ हजार ६०० रुपयांवरुन ९ लाख ३ हजार ८०० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात २८० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर ९० हजार ६६० रुपयांवरुन ९० हजार ३८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.

इतर शहरातील सोन्याचे दर काय?

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरात काल २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजार ६६० रुपये होता. तो दर आह ९० हजार ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

तर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरात काल २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ८२ हजार ८५० रुपये होता. तो दर आह ८३ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -