

Waqf Act : देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली: वक्फ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक ...
काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी करुन त्याचे कायद्यात रुपांतर करण्याआधीच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मोहम्मद जावेद हे लोकसभेतील काँग्रेसचे व्हीप आहेत. ते बिहारच्या किशनगंजमधून निवडून आले आहेत. विधेयकाचा मसुदा करण्यासाठी सूचना आणि शिफारशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे ते सदस्य होते. आपचे आमदार अमानतुल्ला खान आणि एपीएसआर यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर रविवारी जमियत उलेमा-ए-हिंद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

Amit Shah : "तुम्ही शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या"
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नक्षलवाद्यांना आवाहन बस्तर : जे नक्षलवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावं. जे नाही करणार त्यांना ...
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली, तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १३२ आणि विरोधात ९५ मते पडली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर शनिवारी राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केली. यानंतर देशात एकीकृत वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा, १९९५ अर्थात उमीद कायदा लागू झाला आहे.