Wednesday, May 21, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

BJP : भाजपाच्या किरीट सोमैयांनी ७२ मशिदींविरोधात नोंदवला FIR

BJP : भाजपाच्या किरीट सोमैयांनी ७२ मशिदींविरोधात नोंदवला FIR
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या अर्थात भाजपाच्या किरीट सोमैया यांनी गोवंडीतील ७२ मशिदींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये नमूद ७२ मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकाचा अर्थात लाऊडस्पीकरचा बेकायदा वापर सुरू असल्याची तक्रार किरीट सोमैया यांनी केली आहे. परवानगी न घेताच मशिदींकडून लाऊडस्पीकरचा वापर सुरू आहे, असा किरीट सोमैया यांचा आरोप आहे.





किरीट सोमैया यांनी पाच एप्रिल रोजी गोवंडीती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोवंडीतील ७२ मशिदींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. परवानगी न घेताच गोवंडीतील ७२ मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकाचा अर्थात लाऊडस्पीकरचा बेकायदा वापर सुरू असल्याची तक्रार किरीट सोमैया यांनी केली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर एक्स पोस्ट करुन तक्रार केल्याची माहिती किरीट सोमैया यांनी सार्वजनिक केली आहे.
Comments
Add Comment