Thursday, April 10, 2025
Homeताज्या घडामोडीST Bus : एसटीच्या ५० कालबाह्य बसेस भंगारात; परिवहन महामंडळाचा निर्णय

ST Bus : एसटीच्या ५० कालबाह्य बसेस भंगारात; परिवहन महामंडळाचा निर्णय

वसई : पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार, पालघर असे महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारातून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. यातून मोठ्या संख्येने प्रवासी करतात. सद्यस्थितीत सर्व आगारात मिळून ४३५ इतक्या एसटीच्या बसेस असून दिवसाला ३५० ते ३९० इतक्या बसेस सोडल्या जातात; परंतु यातील काही एसटी बसेस (ST Bus) जुन्या झाल्याने खीळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे सुद्धा प्रवासादरम्यान अडचणी येतात तर काही वेळा मध्येच तांत्रिक बिघाड होऊन ही बस बंद पडण्याच्या घटना, चाक निखळण्याच्या घटना घडत असतात. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसतो. (Transport Corporation)

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! माजिवडा उड्डाणपूल १५ दिवस बंद

यामुळे यंदाच्या वर्षात जवळ-जवळ ५० एसटी बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत. त्या जागी टप्प्या टप्प्याने नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील एसटी आगारात ही बारा व पंधरा वर्षे उलटून गेलेल्या कालबाह्य झालेल्या बसेस आहेत. अशा बसेसमधून काही वेळा प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे खीळ खिळ्या व भंगार अवस्थेत असलेल्या बसमधून प्रवास करतानाही अनेक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा या जुन्या झालेल्या बसेसचा ब्रेक लागत नाही त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागते. (Palghar News)

नवीन ई-बस ळे फेर्‍या वाढणार

सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात. मात्र शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत होत्या. काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत लागली होती.यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून ई बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरवातीला ५७ ई बसेस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ४० ई बस पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता आणखीन नवीन १७ ई बसचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २० कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. लवकरच नवीन १७ ई बस पालिकेच्या ताफ्यात दाखलह होणार आहेत नवीन बस प्राप्त झाल्यावर त्या नवीन मार्गावर किंवा जेथे अजून बस सेवा सुरु नाही अशा मार्गावर परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -