Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलमाझं काय चुकलं ?

माझं काय चुकलं ?

आमच्या गावचा बबलू
आळशीच आहे फार
शब्दाला मात्र सदानकदा
लावीत बसतो धार

शाळेत एकदा तो
खूपच उशिरा आला
सरांनी विचारले त्याला,
‘का रे उशीर झाला?’

बबलू म्हणाला, ‘गुरुजी,
आज आळसच लय आला
म्हणूनच शाळेत यायला
उशीर मला हो झाला…!’

गुरुजी म्हणाले, ‘अरे आपण
आळसाला शत्रू मानतो
प्रगतीच्या मार्गात आपल्या
अडथळा तो आणतो’

बबलू लगेच म्हणाला,
‘गुरुजी, माझं काय चुकलं?
शत्रूवरती प्रेम करा,
तुम्हीच आम्हास सांगितलं.’

गुरुजींना कळून चुकले
बबलू बोलण्यात तरबेज
फार सोयीचा अर्थ काढून
करी समोरच्याला गपगार !

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) नाजूक हिरवी
कोवळी किती
लहानशा झुळकीनेही
कमरेत वाकती

जमिनीवर हिरवीगार
जणू शाल अंथरते
जनावरांचे लुसलुशीत
अन्न कोण होते?

२) श्री लिहून काहीजण
करतात सुरुवात
घरचा पत्ता लिहितात
उजव्या कोपऱ्यात

मायना लिहून
नमस्कार करतात
शेवटी ता.क. लिहून
गोडी कोण वाढवतात?

३) झाड होऊन
शितल छाया धरतो
झरा होऊन
खळखळून हसतो

नदी होऊन
पुढे जाण्यास सांगतो
देण्यातला आनंद कोण
लुटण्यास शिकवतो?

उत्तर –

१) गवत
२) पत्र
३) निसर्ग

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -