हैदराबाद: कर्णधार शुभमन गिलच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर ७ विकेट राखत दमदार विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेले १५३ धावांचे आव्हान गुजरातने ७ विकेट राखत पूर्ण केले. सामन्यात आधी गोलंदाजीमध्ये सिराजने विकेटचा चौकार मारला त्यानंतर फलंदाजी कर्णधार शुभमन गिलने क्लास खेळी करत हैदराबादचा पराभव केला.
शुभमन गिलने नाबाद ६१ धावांची खेळी केली. तर त्याला सुंदर साथ लाभली ती वॉशिंग्टन सुंदरची. सुंदरने ४९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. रुदरफोर्ड ३५ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या हैदराबादची सुरूवात खराब राहिली. पहिल्याच षटकांत सिराजने हैदराबादचा मजबूत फलंदाज ट्रेविस हेडला बाद केले. हेड ८ धावा करून बाद झाला. यानंतर ५व्या षटकांत अभिषेक शर्माही बाद झाला. त्याने १८ धावा केल्या. ईशन किशनकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र त्यालाही १७ धावाच करता आल्या.
पुढच्याच षटकांत नितीश रेड्डीही बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये पॅट कमिन्सने काही चांगले शॉट खेळले त्यामुळे हैदराबादला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.