Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन


मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची (Mumbai News) बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी मुंबईतील काही भागात जलवाहिन्यांच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा, तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून प्या, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)



मिळालेल्या माहितीनुसार,एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जुनी झाली आहे. या कारणाने जुनी जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे - कुर्ला संकूल परिसरामध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.


या जलवाहिनी विषयक कामकाज झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Water Supply)

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या