का हासला किनारा पाहून धुंद लाट
पाहूनिया नभाला का हासली पहाट?
होती समोर माया, गंभीर सागराची
संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ !
चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्न रम्य हात !
गीत : जगदीश खेबूडकर
स्वर : अनुराधा पौडवाल, शोभा जोशी
ऊठ राजसा घननीळा…
ऊठ राजसा घननीळा हासली रे वनराणी
उडे थवा पाखरांचा गात गात मंजुळ गाणी
यमुनेचं गारगार खळाळलं आतां पाणी
ऊठ सख्या नीलमणी, साद घालिती गौळणी
नेत्रकमळे उघड बाळा पुष्प सांगे डोलुनी
सांगतो रे ऊठ राजा मंद वारा वाहुनी
जाग आली गोकुळाला, नाद छुमछुम पैंजणी
ऐकु येई धेनुची ही हाक तुझिया अंगणी