Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘डॉल्फिन पालकत्व विरुद्ध टायगर पालकत्व’

‘डॉल्फिन पालकत्व विरुद्ध टायगर पालकत्व’

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

आजकाल पालक आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी पालकत्वाच्या विविध पद्धती अवलंबताना दिसतात. त्यातीलच एक आहे ‘डॉल्फिन’ पालकत्व. बरेच पालक या पद्धतीला परफेक्ट पॅरेन्टिंग स्टाईल मानतात. कारण यातून मुलांना योग्य दिशा प्राप्त होते. डॉल्फिन पॅरेन्टिंग हा शब्द सर्वप्रथम ब्रिटिश सायकॅट्रिस्ट डॉक्टर झिमी कांग यांनी वापरला.

डॉल्फिन पॅरेन्टिंग ही पालकत्वाची अशी एक पद्धत आहे जी मुलांना स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. डॉल्फिन पॅरेंन्टस मुलांकरिता काही सर्वसाधारण नियम बनवतात. पण मुलांमधील सृजनशीलतेलाही ते महत्त्व देतात. या पालकत्व पद्धतीत मुलांच्या आयुष्यात समतोल राखणे हा उद्देश असतो. मुलांना स्वतःहून निर्णय घ्यायला आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यास या पालकत्व पद्धतीत प्रोत्साहन दिले जाते.

डॉल्फिन आणि टायगर पालकत्वातील फरक :

साधारणतः आपण दोन प्रकारच्या पालकत्व पद्धतीचा अवलंब करतो. काही पालक कडक शिस्तीचे (टायगर) असतात तर काही सहज (डॉल्फिन ) पालक असतात.

दोन्ही पालकत्वपद्धती एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. खरंतर विरुद्ध आहेत. डॉल्फिन पालकत्वात समतोल असतो तर टायगर पालकत्वात मुलांवर फक्त हुकूम चालवला जातो. डॉल्फिन पालकत्वात मुलांनी चुका केल्या तर त्यांना चुका करण्याची संधी दिली जाते. स्वातंत्र्य दिले जाते. याउलट टायगर पालकत्वात मुलांवर पूर्ण नियंत्रण ठेवले जाते.

या दोन पालकत्वातील अंतर आता पूर्णपणे समजावून घ्या –

  • टायगर पालकत्वात पालक हुकूमशहाप्रमाणे वागतात.
  • या पालकत्वात पालक आपल्या मुलांबाबत खूप ‘ओव्हर प्रोटेक्टिव्ह’ असतात.
  • त्यांच्या मुलांसंबंधीचे सगळे निर्णय ते स्वतः घेतात.
  • मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येचे निराकरण तेच करतात.
  • या प्रकारच्या पालकत्वात मुलांकडून समतोल वागण्याची अपेक्षा केली जाते.

डॉल्फिन पालकत्वात आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते. आयुष्यातील चढउतारांना तोंड देण्यासाठी मजबूत बनवतात.
अभ्यासाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीत भाग घेण्यासाठी पालक मुलांना प्रोत्साहन देतात. ते आपल्या मुलांवर अभ्यासाबाबत दडपण आणत नाहीत. एखादी चूक झाली तर त्याकरिता कठोर शिक्षा केली जात नाही. डॉल्फिन पालकत्वात मुलांवर सकारात्मक प्रभाव टाकतं. कारण यात मुलांना मोकळेपणाने जगण्याची संधी मिळते. ते आपल्या आजूबाजूचं जग एक्स्प्लोअर करतात.

असे पालक मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडींचीही ते काळजी घेतात. आपल्या मुलांशी त्यांचं मजबूत नातं असतं. ते तसं नातं तयार केल्याने मुलं न घाबरता काम करू शकतात. यामुळे मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सजग राहतात.

डॉल्फिन पालकत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य की हे पालक मुलांच्या त्या त्या वयातील आपल्या मुलांच्या गरजांनुसार स्वतःला बदलतात. याचा त्यांच्या मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. मुलांशी ते नेहमी गप्पा मारतात. खूप कडक नियम ठरवत नाहीत. जास्त सूचना देत नाहीत. प्रत्येक गोष्टीवरून टोकत नाहीत. यामुळे सामाजिक कौशल्य अधिक प्रभावी होतात.

  • मुलांचा आत्मविश्वास मजबूत होतो.
  • जबाबदारीची जाणीव त्यांच्यात लवकर विकसित होते
  • प्रश्न सोडवणे, निर्णय घेण्याची कौशल्ये विकसित होतात.
  • कोणतंही नवीन काम करायला मुलं घाबरत नाहीत.
  • डॉल्फिन पॅरेंन्टिंगचे काही तोटेही होऊ शकतात.
  • यामध्ये मुलं स्वतःला अतिस्वातंत्र्य मिळाल्याने चुकीचे निर्णय घेऊ शकतात.
  • पालकांसाठी योग्य मार्गदर्शन आणि स्वातंत्र्य यांचा तोल सांभाळणं कठीण होत जातं.
  • कधी कधी पालक गोंधळात पडतात की कधी मुलांवर लगाम घालावा आणि कधी त्यांना सूट द्यावी हे पालकांना समजत नाही.
  • या पालकत्व प्रकारामुळे कधीकधी मुलांमध्ये शिस्तीचं प्रमाण कमी दिसून येतं.

डॉल्फिन पालकत्वाचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवू या.

अशा काही गोष्टी, नियम ठरवा ज्या गोष्टींचे पालन मुलं कोणत्याही दबावाविना पालन करू शकतील.
अतिस्वातंत्र्य देऊ नये. थोडे लक्ष देणंही आवश्यक आहे. मुलांसमोर अपशब्द, शिव्यांचा वापर करणं घातक ठरतं.
मुलांना स्वव्यवस्थापन आणि स्वनिगेचे महत्त्व समजावून सांगा.

उत्तम पालकत्व हा मुलांच्या भविष्याचा पाया असतो. यासाठी मुलांना समजूतदारपणा, धैर्य, सहानुभूती, विश्वास आणि पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा पालकांनी द्यायला हवा.

टायगर पालकत्वात पालक मुलांना पूर्णपणे कंट्रोल करतात. या पालकत्वात मुलांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते पण पालक लक्ष ठेवून असतात. आपल्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी मुलांना प्रेरित करतात. मात्र आपलं मूल प्रत्येक क्षेत्रात अचूक, परफेक्टच असलं पाहिजे असा या पालकांचा आग्रह असतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -