
बुलढाणा : आज राम नवमी सोहळा (Ram Navmi 2025) असून राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे दिसत आहे. प्रभू राम जन्माच्या सोहळ्यासाठी अनेक देव-देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shegaon)

वनमंत्र्यांकडून हिरवा झेंडा चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील (Chandrapur News) पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी (Tadoba Safari) थेट सुविधा उपलब्ध ...
संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हा पासून शेगावात रामनवमीचा (Shegaon Ramnavmi) सण साजरा केल्या जातो. त्याचप्रमाणे यंदाही शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. 'गण गण गणात बोते'च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्हयाच्या संत नगरी शेगावात रामनवमी चा उत्सव निमित्त मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्री चां पालखी सोहळा असणार आहे.
दरम्यान, या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. आज सुद्धा मंदिर खुले असणार आहे. तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.