नेरळ (रायगड जिल्हा) : बदलापूर ते कर्जत विभागातील नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांची हालचाल वेगाने करणे शक्य व्हावे यासाठी काही तांत्रिक कामं केली जाणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवार ६ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या वेळेत विशेष ब्लॉक आहे. यामुळे बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत उपनगरी रेल्वे उपलब्ध राहणार नाही. ब्लॉक असल्यामुळे पाच मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. लांब पल्ल्यांच्या रेल्वेसह ११ लोकल फेऱ्यांवरही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. रविवारी सकाळी ९.३० ची सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहणार आहे.
वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी
मुंबईत आणखी एक नवीन टर्मिनस होणार
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच आठवे टर्मिनस होणार आहे. अलीकडेच रेल्वे मंडळाने या टर्मिनससाठी मंजुरी दिली आहे. ...
Mumbai Railway Megablock : जाणून घ्या रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लॉकची वेळ
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीसाठी रविवार ६ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. मेगाब्लॉक काळात अनेक गाड्या रद्द केल्या जातील अथवा ...
नेरळ स्थानकात रेल्वे रुळांशी संबंधित तांत्रिक कामं
स्थानक बदलापूर ते कर्जत
जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर
वेळ - सकाळी ८.३० ते दुपारी २.३०
बदलापूर येथून सुटणाऱ्या लोकल
सकाळी ११.२५ कर्जत-सीएसएमटी
दुपारी १२.०० कर्जत-सीएसएमटी
दुपारी १२.२३ कर्जत-सीएसएमटी
दुपारी १.०० कर्जत-सीएसएमटी
दुपारी १.२७ कर्जत-ठाणे
बदलापूर येथे रद्द होणाऱ्या लोकल
सकाळी ०९.५७ सीएसएमटी-कर्जत
सकाळी १०.३६ सीएसएमटी-कर्जत
सकाळी ११.१४ सीएसएमटी-कर्जत
दुपारी १२.०५ ठाणे-कर्जत
दुपारी १२.२० सीएसएमटी-खोपोली
कर्जत-पनवेलमार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
११०१४ कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस
१२१६४ चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस
१२४९३ मिरज-हजरत निजामुद्दीन