Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ कॅरेट सोन्याच्या १६ सळ्या जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ कॅरेट सोन्याच्या १६ सळ्या जप्त

मुंबई :  मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या विभाग क्रमांक तीन पथकाने १.०२ कोटी रु. किंमतीच्या २४ कॅरेट सोन्याच्या सळ्या (१६ तुकडे) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात कस्टम विभागाने एका संशयिताला अटक करून त्याच्या विरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा शुल्क विभागाच्या कर्तव्यावर असलेल्या विभाग क्रमांक तीन पथकाला ४ एप्रिल २०२५ रोजी जेद्दाहहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमान क्र. ६E९२ ने आलेल्या एका प्रवाशाच्या सामानाचा संशय आला. त्या सामानाची सखोल तपासणी करताना सामान तपासणी यंत्रामध्ये दोन इलेक्ट्रिक इस्त्री प्रेसमध्ये गडद प्रतिमा आढळल्या. इस्त्री प्रेस उघडून पाहिल्यावर त्यामधून २४ कॅरेट सोन्याच्या सळ्या (१६ तुकडे) सापडले.या सळ्यांचे एकूण वजन १२०० ग्रॅम आहे.

बाजारात या २४ कॅरेट सोन्याच्या १६ तुकड्यांची अंदाजित किंमत १.०२ कोटी रुपये आहे. या प्रकरणात संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -