
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण आणि पायाभूत सुविधांसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. याप्रसंगी बोलताना, सबका साथ सबका विकास या दृष्टीकोनातून भारत कार्यरत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. श्रीलंका हा फक्त भौगोलिकदृष्ट्या शेजारी देश नाही तर भारताचा चांगला मित्र देश आहे. याच कारणामुळे श्रीलंकेच्या कठीण काळात भारत ठामपणे श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आणि यापुढेही श्रीलंकेसोबत असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे फक्त माझा नाही तर १४० कोटी भारतीयांचा गौरव आहे. ही आमच्यासाठई अभिमानाची बाब आहे; असे पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्रीला ऐतिहासिक बंध आहेत. दोन्ही देशांची मैत्री खूप जुनी आहे. भारतासाठी ही बाब महत्त्वाची आहे की एक शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही कायम श्रीलंकेच्या पाठीशी आहोत आणि राहणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.Addressing the press meet with President @anuradisanayake. https://t.co/yX4QG8WI4E
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2025
