Tuesday, April 22, 2025
Homeक्राईमAmbernath Crime : कलिंगड विक्रीआड सुरु नवजात बाळांची विक्री; 'असा' आला धक्कादायक...

Ambernath Crime : कलिंगड विक्रीआड सुरु नवजात बाळांची विक्री; ‘असा’ आला धक्कादायक प्रकार उघडकीस

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर (Ambernath Crime) आली आहे. कलिंगड विक्रीच्या नावाखाली बाळ विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार कचरा टाकण्यावरुन हटकल्यामुळे समोर आलं आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे या प्रकाराचा पर्दाफाश झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Child Sale Racket)

Gokul Milk : मुंबईत गोकुळ दूध विक्रीत ६० हजार लिटरने घट!

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिमेतील फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विक्री करणारा तुषार साळवे (२४) हा गेल्या काही वर्षांपासून कलिंगड विक्रीचा व्यवसाय करत आहे. मात्र या विक्रीआड त्याचा नवजात बाळांना विक्रीचा काळाधंदा सुरु होता. एके दिवशी आरोपी कलिंगड विक्रेत्याचा कचरा टाकण्यावरून वनविभाग कर्मचाऱ्याशी वाद झाला होता. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोपी तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासण्यात आला. यावेळी आरोपीच्या मोबाईलमध्ये लहान बाळांच्या खरेदी-विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली.

धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Child Sale Racket)

२०१३ पासून सुरु बाळविक्रीचा धंदा

आरोपी तुषार साळवे याला २०१३ मध्ये अटक होऊन जामीनावर सुटून पुन्हा त्याने बाल विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर पुन्हा त्याला २०२३ मध्ये ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. परंतु या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे. (Child Sale Racket)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -