Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कर्नाटक : कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथे भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

कर्नाटक : कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथे भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील नेलोगी क्रॉसजवळ आज, शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एका व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.




मृतांमध्ये सर्वजण बागलकोट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने कलबुर्गी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक ए. श्रीनिवासुलु यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी नेलोगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment