Saturday, May 3, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

BSF : भारत - पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत घुसखोर ठार

BSF : भारत - पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत घुसखोर ठार
जम्मू : भारत - पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. ही घटना जम्मू सेक्टरमध्ये घडली.
जम्मू सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दल सावध झाले. जवान डोळ्यात तेल घालून घुसखोर सीमेवर लक्ष ठेवू लागले. पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होताच सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. घुसखोराला आधी शरण येण्याचा इशारा देण्यात आला होता. पण या इशाऱ्याला न जुमानता घुसखोर पुढे येत असल्याचे बघून त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. य गोळीबारात घुसखोर ठार झाला. ताज्या घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती देत भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यासमोर निषेध नोंदवला आहे. पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. घुसखोराची ओळख पटविण्याची तसेच घुसखोरीचा प्रयत्न करण्यामागचे कारण जाणून घेण्याची कारवाई सीमा सुरक्षा दलाने सुरू केली आहे.  
Comments
Add Comment