टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
मिशन अयोध्या’ चित्रपटामध्ये शिक्षिकेची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्वी पाटील. चांगल्या भूमिका करण्याचे तिचे स्वप्न आहे.
तेजस्वीच शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला विद्यालयात झाले. ती स्पोर्ट्समध्ये होती. कुडाळमधील एस. आर. एम. कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. कुडाळमध्ये तिने फॅशन शोमध्ये भाग घेतला. चार-पाच जिल्ह्यांचा मिळून एक फॅशन शो झाला होता. त्याची फायनल कोल्हापूरला झाली होती. ती स्पर्धा ती जिंकली होती. त्यानंतर ती एम. बी. ए. करण्यासाठी पुण्याला आली. तिचं लग्न ठरलं. लग्न ठरतानाच तिच्या पतीने तिची आवड विचारली होती, तिने ॲक्टिंगची आवड असल्याचे सांगितले होते.
लग्नानंतर तिने मुंबई गाठली होती. ‘आपल ठेवा झाकून’ या नाटकात तिने अभिनेते सतीश तारे सोबत काम केले. त्याच वर्षी जेमिनी कुकिंग ऑईलची जाहिरात तिने केली. ‘प्राजक्ता ‘नावाची मालिका तिला मिळाली. ‘प्रेमाचा झोल झालं’ नावाचा चित्रपट मिळाला. त्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत तिने काम केले. ‘अगडबंब’, ‘एक अलबेला ‘ हे चित्रपट तिने केले. ‘स्वाभिमान ‘नावाची मालिका केली.
‘मिशन अयोध्या’ या चित्रपटात तिची स्वाती नावाच्या शिक्षिकेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांशी हसून खेळून राहणारी, त्यांच्या चांगल्या बाबींना ती सपोर्ट करते. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांची अयोध्येला जाण्याची सहल आयोजित करतात. त्या ठिकाणची संस्कृती जाणून घेण्यासाठी ती सहल आयोजित केली जाते. त्या सहलीमध्ये ती सहभागी होते. मे महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते. त्यावेळी तेथील तापमान खूप गरम होते. त्यांना सकाळी लवकर शूटिंग करायला लागायचे. चित्रीकरणासाठी परवानगी घ्यावी लागली. सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले. श्री प्रभू रामांचे दर्शन झाले. मिशन अयोध्या हा चित्रपट त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला आहे.