Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Gokul Milk : मुंबईत गोकुळ दूध विक्रीत ६० हजार लिटरने घट!

Gokul Milk : मुंबईत गोकुळ दूध विक्रीत ६० हजार लिटरने घट!

मुंबई : दूध हाताळणीसाठी नवीन यंत्रणा व मशीनमुळे नव्या ठेकेदाराकडून याची हाताळणी वेळेत झाली नसल्याने जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध (Gokul Milk) संघाच्या मुंबई येथील एक दिवसाची दूध विक्री (Milk Selling) सुमारे ६० हजार लिटरने घटली होती. त्यामुळे ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना तातडीने मुंबईला जावे लागल्याचे समजते. दिवसभर ते मुंबई कार्यालयात यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत राहिले. दिवसभराच्या चर्चेनंतर हा ठेका पुन्हा बदलण्याचा निर्णय झाला. (Gokul Milk sale down)



जुन्या ठेकेदारालाच ठेका देऊन दूध विक्री पूर्ववत केली आहे. मुंबई येथे गोकुळची सुमारे तीन लाख लिटर दूध विक्री होते. दुधाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे मुंबईत गोकुळ दुधाला चांगली मागणी आहे. दरम्यान, गोकुळने पूर्वीचा ठेका बदलून नवीन ठेकेदाराकडे हे काम दिले होते. मात्र, नवीन मशीन व तंत्रज्ञानामुळे नवीन ठेकेदाराला दूध विक्री वेळेत करता आली नाही. त्याची हाताळणीही जमली नाही. त्यामुळे एक दिवसाच्या सुमारे ६० हजार लिटर दूध विक्रीवर परिणाम झाला आहे.


नवीन ठेकेदाराला दूध विक्रीचे नियोजन जमले नाही. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेत जुन्या ठेकेदारालाच पुन्हा ठेका देऊन दूध विक्री पूर्ववत केली आहे. त्यामुळे सध्या मुंबई येथील दूध विक्री सुरळीत आहे, असे अरुण डोंगळे, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ व सहसंचालक, उच्च शिक्षण संचलनालय यांनी सांगितले. (Gokul Milk sale down)

Comments
Add Comment