Fake Aadhaar Card: AIचा गैरवापर! ChatGPTवर बनवले नकली आधार कार्ड!

मुंबई : ओपनएआयने गेल्या आठवड्यात चॅटजीपीटीच्या (ChatGPT) नवीन फीचर्सची घोषणा केली असून, त्यामध्ये स्टुडिओ घिबली स्टाईलमधील फोटो तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घिबली स्टाईल (Ghibli style) मधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या नव्या फीचरमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अनेकांनी या स्टाईलमध्ये फोटो तयार करून शेअर केले आहेत. मात्र, यासोबतच काही गंभीर धोकेही समोर येऊ लागले आहेत.


काही सोशल मीडिया युजर्सनी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत बनावट आधार कार्डाचे फोटो (Fake Aadhaar Cards via ChatGPT) तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या फीचर्सचा समावेश करणे कितपत योग्य आहे, (Fake Aadhaar Card Made on ChatGPT) यावर मोठा वाद सुरू झाला आहे.


Fake Aadhaar Cards via ChatGPT

चॅटजीपीटीच्या फोटोरिअलिस्टिक इमेज जनरेशन तंत्रज्ञानामुळे हे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. काही युजर्सनी आधार कार्डासारखे फोटो तयार करण्याचा प्रयत्न केला आणि ते खऱ्या आधार कार्डाच्या अगदी जवळ जाणारे होते. फक्त चेहऱ्यांमध्ये थोडासा फरक दिसत होता.



एक्सवरील काही वापरकर्त्यांनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून शेअर केली. विशेष म्हणजे, या कार्डांवर क्यूआर कोड आणि आधार क्रमांकही स्पष्ट दिसत होते, त्यामुळे ही बाब अधिक चिंताजनक ठरली आहे.


Fake Aadhaar Cards via ChatGPT

ओपनएआयने आपल्या जीपीटी-4ओ नेटिव्ह इमेज जनरेशन सिस्टम कार्डमध्ये स्पष्ट केले आहे की, हे नवीन मॉडेल डॅल-ईच्या तुलनेत अधिक धोके निर्माण करू शकते. डॅल-ईपेक्षा वेगळे असलेले हे ऑटोरिग्रेसिव्ह मॉडेल थेट चॅटजीपीटीमध्ये कार्यान्वित आहे, त्यामुळे त्याचा वापर अधिक सहज शक्य होतो.


या तंत्रज्ञानामुळे नवीन प्रकारचे धोके समोर येत असल्याचे ओपनएआयने मान्य केले आहे. सध्या चॅटजीपीटीवर मुलांचे फोटोरिअलिस्टिक फोटो, हिंसक, अपमानजनक किंवा द्वेषपूर्ण फोटो तयार करण्यास कठोर निर्बंध आहेत. मात्र, तरीही या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे हे मोठे आव्हान ठरत आहे.

Comments
Add Comment

नद्यांमधील गाळातून निघणारी वाळू आणि माती मोफत वाटणार

महसूल विभागाची नवी मार्गदर्शक नियमावली; शेतकऱ्यांना माती, तर घरकूल लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रासपर्यंत मोफत

ZP Elections : राज्यातील रखडलेल्या 'झेडपी' आणि पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये?

- राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र; ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची

Mantralaya Canteen : मंत्रालयातील कँटीनच्या फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ!

- उच्च न्यायालयाने 'एफडीए'ला सुनावले; सरकारी उपहारगृहे आणि खासगी आस्थापनांना वेगळा न्याय लावू नका मुंबई :

Pink e-rickshaw : 'पिंक ई-रिक्षा' योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ

 महिलांना आता मिळणार ४० टक्के अनुदान; जुन्या लाभार्थ्यांनाही वाढीव सवलतीचा फायदा मुंबई : राज्यातील महिलांना

Nitesh Rane : अमित शहांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही

- मंत्री नितेश राणे; धमकीच्या आरोपांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा अभिजित दीपके यांना सल्ला मुंबई : केंद्रीय

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ₹2 लाखांची मदत जाहीर

पीएमएनआरएफमधून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख, जखमींना ₹50 हजार ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी येथे कोहिनूर